" स्वामी " खूप काळ गेला, लिहावसं वाटत होत पण तुम्ही ते शरदला सांगता म्हणून धाडस केलं नाही. पण तरीही आंतरिक इच्छा स्वस्थता देईना. जे काही सुचेल उमजेल ते तुमच्या चरणी अर्पण !!!
लिहताना सुरवात नेमक्या कोणत्या विषयावरून करावी या विचारात असतानाच सध्या सगळीकडेच वारीचा उत्साह शिगेला असताना तुकोबांची ही माझ्या मनातली ओवी ....
समचरण दृष्टि विटेवरी साजिरी। तेथे माझी हरी वृत्ती राहो।
आणिक न लगे मायिक पदार्थ। तेथे माझे आर्त नको देवा॥
"समचरण दृष्टी" पहिल्याच शब्दात संपूर्ण समर्पणाचा सिद्धांत, म्हणूनच मला भावलेली ही ओवी.....
The Ultimate Devotion never demands availability even of the suitable surrounding. This very verse is dear to me because it just let me be suspended in which is ultimate and not seasonal. It allows the wisdom that no matter you are really high or low in your life, Treat It Equally, just by steadily focussing on the Ultimate { हरी }. This will offer you exuberance which ultimately is required for life nothing else.
खरे तर आयुष्यात असे खूप प्रसंग आले, काहींना सामोरी झाले, तर काहींपुढे झुकले - वेळेची गरज म्हणून. आणि ह्या प्रत्येक वेळी सद्गुरूंनी मात्र नेहमी त्यांचे अंगुली दर्शन त्यांच्या चरणाकडे दाखवून मार्गदर्शन केले. आनंदाने आकाशात भरारी मारणारे मन असो वा मिट्ट काळोख पाहून घाबरून बिथरलेले मन . पण त्यांनी मात्र फक्त त्यांच्या अंगुली निर्दर्शनानेच ही स्थिर वृत्ती तयार करवून घेतली. मोह-मायेच्या आर्त ओढीपेक्षा समर्पणाच्या डोहात एकचित्त असण्याच्या अवधूतानंदानेच आयुष्य साजिरे झाले आहे. आणिक काही न लगे मज!
Great thought .....
ReplyDelete